Type Here to Get Search Results !

"हे डोकं शिंदेंचं नसून, भाजपचं कारस्थान": शिवसेनेचा आरोप!



मुंबई - राज्यातील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. मात्र, हा बंड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मान्य नसल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. आता, शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना राज्यात रंगला आहे. आता, शिवसेनेनं रोखठोकमधून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. तसेच, भाजपवरही गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेवर दावा सांगण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न हे एकनाथ शिंदेंचं डोकं नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. 



एकीकडे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे आनंद दिघे यांच्या नावाने शिंदे गट हिंदुत्त्वाचा वसा जपत आम्हीच हा वारसा पुढे नेत असल्याचं सांगतोय. शिवसेना पक्षावरुन, शिवेसना पक्षाच्या चिन्हावरुन आता कायदेशीर लढाई सुरु आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगानेच निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आता लवकरच याप्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल. मात्र, या वादावरुन शिवसेनेनं शिंदे गटावर कडाडून टिका केली. तसेच, हे डोकं शिंदेंचं नसून भाजपचं कारस्थान असल्याचा आरोपही शिवसेनेनं केला आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies