Type Here to Get Search Results !

अंधेरी पोटनिवडणुक मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी: केंद्रीय निवडणूक आयोग!



मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने '१६६ - अंधेरी पूर्व विधानसभा' मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारसंघात मतदानाच्या दिवशी म्हणजे दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



दरम्यान,  ही सार्वजनिक सुट्टी '१६६ - अंधेरी पूर्व' या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies