Type Here to Get Search Results !

“टोल लावून सर्वसामान्यांची लूट केंद्र सरकार करत आहे”; नाना पटोलेंचे मंत्री नितीन गडकरी यांना पत्र!



मुंबई: राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली नाके बंद करावेत, टोल लावून लोकांची लूट का केली जात आहे? अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून केली आहे. 



या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, 'मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून कच्च्या तेलाच्या किंमती 18 डॉलरपर्यंत खाली आल्या होत्या. गेल्या आठ वर्षाचा कच्च्या तेलाचा सरासरी दर हा 52 डॉलर प्रति बॅरल इतकाच आहे. पण इंधनावर भरमसाठ कर लावून मोदी सरकारने 27 लाख कोटी रूपये कमावले आहेत. रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस 1700 टक्क्यांनी वाढवला आहे. तरीही गडकरीजी टोल लावून लोकांची लूट का केली जात आहे?, असा सवाल नाना पटोले यांनी नितीन गडकरींना केला.



राज्यातील बहुतांश राष्ट्रीय महामार्गांचा भार ग्रामीण भागातून जात असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी, शेतमालाच्या विक्रीसाठी व इतर कामकाजासाठी जाताना या रस्त्यावर टोल द्यावा लागतो. अनेक राष्ट्रीय महामार्गांची कामे अपूर्ण आहेत, अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे तरीही वाहनधारकांकडून टोल वसूल केला जात आहे, एकीकडे पेट्रोल डिझेल वर कर आणि सेस लावून आणि दुसरीकडे टोल लावून सर्वसामान्यांची दुहेरी लूट केंद्र सरकार करत आहे. ती तात्काळ थांबवली पाहिजे, असेही पटोले म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies