Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य I शुक्रवार ०७ ऑक्टोबर २०२२ I जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस !




मेष : मित्रांशी गप्पा मारण्यात वेळ घालवाल. घरात सजावटीची कामे कराल. धनलाभाचे योग जुळून येतील. आपल्या स्मरणशक्तीचा फायदा होईल. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल. 


वृषभ: घरात टापटीप ठेवाल. स्वत:ला कामात गुंतवून घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. मित्रांची बाजू जाणून घ्या. काही नवीन शिकण्याचा योग येईल.


मिथुन : हस्त कलेसाठी वेळ काढावा. कौटुंबिक मदत लाभेल. आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष नको.  दिवस समाधानात जाईल. महत्त्वाच्या कामाची अंमलबजावणी कराल. 


कर्क : सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल.  हातातील काम जिद्दीने पूर्ण कराल. व्यापार्‍यांची जुनी कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. 


सिंह : घरगुती खर्च आटोक्यात ठेवा. सल्ला मागणार्‍यांना योग्य मार्गदर्शन करा. समोरील गोष्टीत आनंद माना. प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. 


कन्या : जोडीदाराची बाजू जाणून घ्या. चर्चेतून मार्ग काढता येईल.  कामाचा ताण लक्षात घ्यावा. घरगुती गप्पांमध्ये गुंग व्हाल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. 


तूळ : आजचा दिवस चांगला जाईल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीने बोलाल. झोपेची तक्रार राहील. दिवसभर कामात अडकून राहाल.


वृश्चिक : फसवणुकीपासून सावध राहावे. दिवस संमिश्र जाईल. रागाला आवर घालावी. मन विचलीत करणार्‍या घटना घडू शकतात. लहान प्रवास घडेल.  


धनू : धार्मिक भावना वाढीस लागेल. तरुण वर्गाकडून काही शिकायला मिळेल. हातातील काम मनापासून करावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.  मनातील इच्छा पूर्ण होईल. 


मकर : कमिशन मधून लाभ कमवाल. व्यापारीवर्ग खुश राहील. सर्व खात्री करूनच जबाबदारी घ्या. बाहेर फिरताना सतर्क राहावे. धार्मिक ग्रंथांचे  वाचन करा. 


कुंभ : नवीन कामासाठी संकल्प करावा. कौटुंबिक अडचणींकडे लक्ष द्या. बोलताना भान राखावे. संमिश्र घटनांचा दिवस. अनावश्यक खर्च टाळावा.


मीन : अनावश्यक खर्च टाळावा. विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील.  मनातील निराशेला दूर सारा. रागावर नियंत्रण ठेवा. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies