मुंबई : मुंबई महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा झटका दिला आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा आणि याचिकाकर्त्यांना काय निर्णय घेतला तसे कळवा, असे आदेशच मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उद्याच उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख उद्या आहे. राजीनामा मंजूर होईपर्यंत त्यांना उमेदवारी अर्ज भरता येत नव्हता. अखेर ऋतुजा लटके यांना हायकोर्टाचा दिलासा मिळाला दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी 11 पर्यंत मंजूर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.