मुंबई: अनेक दिवसांचा शिवसेनेच्या नावाचा आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिले आहे.
दरम्यान, शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे त्रिशुल, उगवता सुर्य आणि गदा ही चिन्ह मिळावी अशी मागणी केली होती. तर ठाकरे गटाने त्रिशुल, उगवता सुर्य, गदा आणि मशाल हे चिन्ह सादर केले होते. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची धार्मिक चिन्ह रद्द केली आहेत. त्यामुळं शिंदे गटाचं गदा हे चिन्ह रद्द केलं जाणार आहे. तर दुसरीकडे दोन्ही गटांनी त्रिशुल आणि उगवता सुर्य हे चिन्ह सादर केली होती ही चिन्ह सारखीच असल्यामुळे ही चिन्ह रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळालं आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.