Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, मंगळवार ०४ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!मेष:

वैवाहिक जीवन आनंददायी असेल.  आपण ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. अडथळ्यांची शर्यत पार कराल. व्यापारी वर्गाला प्रगतीकारक दिवस.


 

वृषभ:

नवीन कार्याला चांगला दिवस. घरामध्ये वेळ खर्च होईल.  पण त्यातून समाधान मिळेल. प्रयत्नात कसूर करू नका. दिवसभर मन प्रसन्न राहील. मिथुन:

व्यावहारिक बाबीत सर्व गोष्टी तपासून पहा. बोलण्यात माधुर्य कायम ठेवा. एकंदर व्यवहाराचा आढावा घ्यावा. कचेरीची कामे मार्गी लागतील. कठीण कामे सुलभतेने करू शकाल. कर्क:

कौटुंबिक वातावरणात रमून जाल.  जुनी उधारी वसूल होईल. अधिकारी व्यक्तींची भेट होण्याची शक्यता. मिळकतीत वाढ होईल. हवे असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. सिंह 

प्रेमप्रकरणात पुढाकार घ्याल. घेतलेला निर्णय कायम ठेवा. जुन्या मित्रांशी आशादायक संवाद घडेल.  आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक खर्च जपून करावा. कन्या:

जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. नवीन संधीकडे लक्ष ठेवा. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो.  अती श्रमाचा ताण जाणवेल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. तूळ:

कामाचा जोर कायम ठेवावा. संमिश्र घटनांचा दिवस. अघळ पघळ बोलू नका. स्त्रियांच्या सहवासात रमाल. कामाच्या ठिकाणी मान मिळेल.वृश्चिक:

द्विधा मन: स्थितीत निर्णय घेऊ नका. प्रलोभनाला भुलू नका. मित्रांच्यात वाहवा होईल. कामावरून लक्ष उडू देऊ नका. लोकप्रियतेत वाढ होईल.
धनू:

रोखीचे व्यवहार सावधानतेने करा. व्यावसायिक निर्णय घाईने घेऊ नका. राजकीय सहकार्य लाभू शकेल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. विरोधक पराभूत होतील. मकर:

जुनी येणी वसूल होतील. शेअर्स मध्ये गुंतवणूक करा. इच्छेविरूद्ध प्रवास करावा लागू शकतो. अचानक धनलाभाची शक्यता. मित्रांच्या भेटीचे योग येतील.कुंभ:

उत्तम कार्यशैली वापराल. मित्रांची योग्य पारख करा. क्षुल्लक मतभेदाकडे दुर्लक्ष करा. अती तिखट पदार्थ खाऊ नका. जोडीदाराच्या सहवासात आनंद लाभेल. मीन:

जोडीदाराशी मतभेद संभवतात.  पित्त विकाराचा त्रास जाणवेल. मानसिक स्वास्थ्य जपावे. चारचौघांत तुमची वाहवा होईल. कोणावरही अती विश्वास टाकू नका. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies