Type Here to Get Search Results !

“भविष्यात राज्याचं नव्हे देशाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करणार”!



नागपूर :भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष निवडून आले. सध्या ते शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर होते. सकाळी भंडारा येथील लक्ष्मी सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्यात अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हेही उपस्थित होते. 



यावेळी नरेंद्र भोंडेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे. ते देशाचे नेते होऊ शकतात. फडणवीस यांच्या राजकीय कामाचा सगळ्यांवर प्रभाव आहे. सर्वचं आमदार त्यांना रिस्पेक्ट देतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखं असते ते गुरुचं असतात. भविष्यातले देशाचे नेते हे देवेंद्र फडणवीस आहेत. राज्यंच नाही तर भविष्यात देशाचं नेतृत्व फडणवीस करणार आहेत.




दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भंडारा – गोंदिया खासदार सुनील मेढे यांच्या कार्यअहवालाचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा आणि भाजप मेळावा घेण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies