Type Here to Get Search Results !

दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार-आमदार शिंदे गटात होणार सामील?



नागपूर : मुंबईत आज शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा गट आणि शिंदे गट आज दसरा मेळाव्यानिमित्त आमने-सामने आहे. शिंदे गट दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणार असल्याचा दावा शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे यांनी केला आहे.



खासदार कृपाल तुमाणे म्हणाल्या, “आजच्या दसरा मेळाव्यासाठी बाळासाहेबांवर प्रेम करणारे लोक मुंबईत येतील. दसरा मेळावा हे शक्तीप्रदर्शन नाही. अनेक मोठे नेते आज शिंदे गटात प्रवेश करतील. दोन खासदार, पाच आमदार आणि अनेक मोठे नेते या मेळाव्यात शिंदे गटात प्रवेश करतील,  दोन पैकी एक खासदार मुंबईतील तर दुसरा खासदार मराठवाड्यातील असेल, मात्र ते खासदार आमदार कोण आहेत हे संध्याकाळी मेळाव्यात स्पष्ट होईल, असे त्यांनी वक्तव्य केले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies