मुबंई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असून ही निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढविणार असल्याची भूमिका काँग्रेसने जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
तसेच, पोटनिवडणुकीमध्ये आपला पाठिंबा असल्याचं सांगत, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुभेच्छा दिल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे संदर्भात काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अतुल लोंढे यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालक कार्यालयात भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.