Type Here to Get Search Results !

.......म्हणून शिंदे गट बीकेसीतील दसरा मेळाव्यामुळे येणार अडचणीत!



मुंबई: शिवसेनेच्या पंरपरेनुसार शिंदे गटाने बीकेसी मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र, शिंदे गटाच्या बीकेसी मैदानातील दसरा मेळाव्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.



शिंदे गटाच्या बीकेसीतील दसरा मेळव्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दिपक जागदेव यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. शिंदे गटाने ग्रामीण भागातून लोकांना मुंबईत आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो बसेस बुक केल्यानं ग्रामीण भागातील लोकांना, विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची याचिकेत तक्रार नोंद करण्यात आली आहे. तसेच १० कोटी रुपये एसटी महामंडळाला कसे आणि कोणी दिले? याचाही तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार आणि आयकर कायदा कलम ६८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचीही याचिकेत मागणी केली आहे. दिपक जगदेव यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.



दरम्यान, या याचिकेमुळे शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies