Type Here to Get Search Results !

‘हा मुलगा तुझी हत्या करेल’, असे मित्राने सांगताच बापाने मुलासोबत केले भयंकर कृत्य!



मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे सावत्र बापाने अडीच वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मुलाचा मृतदेह एका लोखंडाच्या बॉक्समध्ये लपवून ठेवला. हत्येनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लखन कुचबुंदिया असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, दीड महिन्यापूर्वीच महिलेने आरोपीशी विवाह केला होता. आरोपीला दोन बायका असून, दोघीही त्याच्यासोबतच राहतात. आरोपीच्या पहिल्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत. तर दुसरा विवाह दीड महिन्यापूर्वीच केला होता. पीडित महिलेने आपल्या पहिल्या पतीला सोडून आरोपीशी लग्न केले होते. महिलेला पहिल्या पतीपासून अडीच वर्षाचा मुलगा होता. आरोपी लखन हा हिस्ट्रीशीटर आहे. आरोपीला  हा मुलगा मोठा झाल्यावर तुझी हत्या करेल असे मित्रांनी सांगितल्यामुळे आरोपीने सावत्र मुलाची हत्या केली. हत्येसमयी आरोपीने पत्नीला एका खोलीत बंद केले. 



तसेच, मुलाची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह एका बॉक्समध्ये भरुन ठेवला. आरोपी रात्रीच्या सुमारास मृतदेहाची विल्हेवाट लावणार होता. मात्र दोघी पत्नींच्या आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले.



दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल  झाले. पोलिसांनी बॉक्समधून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवत आरोपीचा शोध सुरु केला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies