Type Here to Get Search Results !

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यास ‘कोणत्या’ चिन्हाची दोन्ही गटांना करावी लागेल निवड?



मुंबई: शिवसेनेने धनुष्यबाणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महत्वाची कागदपत्र सादर केली आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. जवळपास चार तास चाललेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर महत्वाची माहिती समोर आली आहे.



धनुष्यबाणाबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक पार पडली.बैठकीला निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक उपायुक्त, निवडणूक चिन्ह प्रभारी, निवडणूक आयोग न्याय विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य प्रमुख बैठकीला उपस्थित होते. जवळपास चार तास बैठक चालली आहे. बैठकीनंतर काय निर्णय घेण्यात येईल याकडे महराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 



दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठावल्यास दोन्ही गटाला उपलब्ध १९७ पैकी एका चिन्हाची निवड करावी लागणार आहे. यामध्ये ठाकरे गटाला हवं असलेलं ढाल, तलवार किंवा वाघ अशा प्रकराचे कोणतंही चिन्ह सदर यादीत नाही. त्यामुळे दोन्ही गट कोणत्या चिन्हाची निवड करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies