मुंबई: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीत असणारे शिवसेना नेते संजय राऊतांना आज न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयात राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.
दरम्यान, न्यायालयाने वेळे अभावी आजच्या जामीन अर्जावरील सुनावणी १७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवली आहे. त्यामुळे राऊतांचा मुक्काम आता १७ ऑक्टोंबरपर्यंत कोठडीतच असणार आहे.