Type Here to Get Search Results !

“....त्यामुळे शिंदे गटाला शिवसेनेच्या चिन्हावर दावा करता येणार नाही”: शिवसेना!



मुंबई:शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण चिन्हावर दावा केल्यानंतर आज शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे बाजू मांडली. व  धनुष्यबाण चिन्ह आपलंच असल्याने शिंदे गट या चिन्हावर दावाच करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.



तसेच, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने स्वेच्छेने पक्ष सोडला आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या चिन्हावर दावा करता येणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. 



दरम्यान, निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना पक्ष चिन्हाबाबतचे त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले होते. उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत शिवसेनेला उत्तर देण्याची मुदत देण्यात आली होती. पण त्यापूर्वीच शिवसेनेने उत्तर देत शिंदे गटाचा दावा फेटाळून लावला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies