Type Here to Get Search Results !

“रमेश लटके आज जिवंत असते तर ते शिंदे गटात असते” : ‘यांचा’ मोठा दावा!




मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठे वक्तव्य केले.



 “दिवंगत आमदार रमेश लटके आज जिवंत असते तर ते शिंदे गटात असते, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.राणे यांच्या दाव्यावर अजून उद्धव ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.मात्र, रमेश लटके असते तर ते खरंच शिंदे गटात असते का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगताना दिसत आहे.



दरम्यान, राणे अंधेरीत प्रचार सभा घेणार असल्याची माहिती भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies