मुंबई: नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर जोरदार टीका केली .
राणे म्हणाले, “मोठ्या मोठ्या माणसावर टीका केली म्हणजे आपण खूप मोठे झालो असं त्यांना वाटतं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. या माणसाला आपण कोण आहोत याचा कधी तरी जाणीव करून दिली पाहिजे. कोण तुम्ही? अपघाताने मुख्यमंत्री झालात. अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात आला, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
तसेच, पोकळ वल्गना आणि शिव्याशापापलिकडे या मेळाव्यात काही नव्हतं. यावेळचा शिवाजी पार्कवरचा मेळावा तमाशाकारांचा मेळावा होता. असेही वक्तव्य नारायण राणे यांनी केली.