मुंबई: उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत युती करुन बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती दिली, हेच म्हणणं शिंदे गटाचं होतं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना त्यांच्या नावाने स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच आहेत, असे प्रविण दरेकर यांनी वक्तव्य केले.
तसेच, बाळासाहेबांची जी शिवसेना होती त्यातील जास्तीत जास्त नेते आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह देखील शिंदे गटाला मिळावं ही अपेक्षा करायला काही हरकत नाही, असेही प्रविण म्हणाले.