Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, बुधवार ०५ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

मन विचलीत होऊ शकते. जोडीदाराच्या सहकार्याने काम पूर्ण कराल. इच्छा नसताना एखादे काम करावे लागेल.  घरातील मोठ्या कामाला गती येईल. मुलांची कृती मनाला लागू शकते. 



वृषभ:

ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. विकतची दुखणी घेऊ नका. उगाच नसते विचार करू नका. विचार करून निर्णय घ्या. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. 



मिथुन:

सावधगिरी बाळगून कामे करावीत. इतरांचा विश्वास संपादन करावा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल.  दिवसाची सुरुवात उत्तम होईल. प्रयत्नात कसूर करू नका. 



कर्क:

आरोग्याची काळजी घ्यावी. छानशौकीपणावर खर्च कराल. दिवसाची सुरुवात मध्यम फलदायी असेल.  खर्चावर ताबा ठेवावा. संयम आणि धिराने परिस्थिती हाताळा. 



सिंह:

हितशत्रू माघार घेतील. लोकांना योग्य सल्ला द्याल. उद्योगाची स्थिती सुधारेल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. जबाबदारीने काम कराल.



कन्या:

मित्रांचे सहकार्य लाभेल. आक्रमकतेने बोलू नका. मदतीचा हात पुढे कराल. व्यापारी क्षेत्रात प्रगती कराल. आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. 



तूळ:

अनेक दिवस वाट पाहत असलेल्या व्यक्तीची गाठ पडेल. हिशोबात चोख राहाल.  भागीदारीत सबुरीने घ्यावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. स्पर्धा परीक्षेची तयारी कराल. 



वृश्चिक:

मेहनतीचे कौतुक केले जाईल.  एकूणच आजचा दिवस संमिश्र राहील. मित्रांचा सल्ला ऐकावा.  जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. कामावर लक्ष केन्द्रित करणे गरजेचे. 



धनू:

वाहन चालवताना काळजी घ्यावी. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन ओळख मैत्रीत बदलेल. मनातील अनामिक भीती दूर होईल. दुपारनंतर धावपळ करावी लागेल.


 

मकर:

आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. विचारांना चांगली दिशा द्याल. चिकाटी व संयम कायम ठेवा.  मनात नवीन कल्पना रुजतील. कामे विलंबाने सुरू करू नका.


 

कुंभ:

स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. मनातील संभ्रम दूर करावा. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.  जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. 



मीन: 

मन विचलीत होणार नाही याची दक्षता घ्या. कौटुंबिक समतोल साधावा. जुने कामे आधी पूर्णत्वास न्या.  भागीदारीच्या कामात अधिक वेळ द्यावा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies