नवी दिल्लीः इराणहून चीनकडे जाणाऱ्या एका विमानात बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती मिळताच विमानाने भारतात नवी दिल्लीत विमान लँड करण्याची परवानगी मागितली. मात्र भारताने ही परवानगी नाकारली.
माहितीनुसार, या विमानाने ईराणमधील तेहरान येथून उड्डाण घेतले होते. त्यानंतर फ्लाइटमध्येच बॉम्ब असल्याची माहिती मिळाली . बॉम्बची माहिती मिळाली तेव्हा विमान दिल्लीच्या आसपास होते. त्यामुळे पायलटने दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली एअरपोर्टने ही परवानगी नाकारली. त्यामुळे सध्या हे विमान भारतातील एअरस्पेसच्या बाहेर गेले आहे.जयपूर विमानतळावर विमानाने लँडिंगची परवानगी होती. मात्र ती नाकारण्यात आली.
दरम्यान, या विमानात बॉम्ब आहे का ते हायजॅक झाले आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. भारतीय वायुसेनेने तडकाफडकी पंजाब आणि जोधपूर एअरबेसमधून एक सुखोई विमान पाठवले आहे. आकाशातील या संशयास्पद विमानावर आपले सुखोई विमान नजर ठेवून असेल.