Type Here to Get Search Results !

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना धमक्या देत शिंदे गटाकडून फोडण्याचा प्रयत्न!




मुंबई: शिंदे गटात येण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना धमक्या आणि विविध आमिष दाखवली जात असल्याचा गंभीर आरोप मनसेचे बोरीवली विभागाचे अध्यक्ष प्रसाद कुळापकर यांनी केला आहे.



कुळापकर यांनी सांगितलं की, शिंदे गटात येण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांकडून धमक्या देण्याबरोबरच विविध आमिष दाखवण्यात येत आहेत. शिवाय मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना कार्यालयात बोलवून शिंदे गटांमध्ये तुम्हाला चांगली पदे देतो, आपल्याकडे सत्ता आहे सत्तेचाही लाभ मिळेल. यासोबतच महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मार्फत देखील शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप कुळापकर यांनी केला आहे.



दरम्यान, आता पहिल्यापासून शिंदे गटाला पोषक भूमिका घेणाऱ्या मनसेवरच शिंदे गटाकडून कुरघोड्या सुरु केल्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies