Type Here to Get Search Results !

अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच केला खून!



चांदवड : नाशिकच्या कातरवाडी येथे अनैतिक संबंधांमध्ये पतीची अडचण येत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्याच नवऱ्याचा खून केल्याची बाब समोर आली आहे. सोपान झाल्टे असे पतीचे नाव आहे. 



माहितीनुसार, संशयित आरोपी मनीषा झाल्टे कातरवाडी येथीलच सुभाष संसारे याच्याशी गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंध आहेत. सोपान झाल्टे या अनैतिक संबंधात अडचण होत असल्याने त्यांना जीवे ठार मारण्याचा प्लॅन पत्नी मनीषा आणि प्रियकर सुभाष यांनी आखला होता. पती मळ्यात झोपायला गेल्याची माहिती पत्नीने प्रियकराला दिली होती. त्यानंतर मनमाड येथील खलील नावाच्या मित्राला घेऊन सुभाष याने सोपान यांच्या डोळ्यात मिर्चीची पूड टाकत लाकडी दांडक्याने सोपान झाल्टे यांच्या डोक्यात मारहाण केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. त्यात सोपान यांचे वडील मध्ये आल्याने त्यांनाही जबर मारहाण करण्यात आली असून ते गंभीर जखमी आहेत. 



दरम्यान, यातील तिघाही आरोपींना नाशिक ग्रामीण पोलीसांनी अटक केली असून अधिकचा तपास केला जात आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies