Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार ०८ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

आरोग्याची काळजी घ्यावी. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. प्रेमातील व्यक्तीशी सुसंवाद साधता येईल. परिश्रमाचे फळ मिळेल. कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. 



वृषभ:

तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. गुंतवणुकीसाठी सल्ला महत्त्वाचा. मानसिक शांतता लाभेल. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. 



मिथुन:

मेहनतीच्या जोरावर प्रगती करता येईल. विनाकारण बढाया मारू नका.  कामातील बदल लक्षात घ्या. काही नवीन तांत्रिक बाबी शिकून घ्या. कार्यक्षेत्रात उन्नती साधता येईल. 



कर्क:

दिवस मध्यम फलदायी. थोडी काटकसर करावी लागेल.  नवीन व्यवहार करताना विचार करावा. घरासाठी काही खर्च कराल. कौटुंबिक जबाबदार्‍या प्राधान्याने पार पाडाल.   



सिंह:

वडीलांचे मोलाचे सहकार्य लाभेल. जुने आजार अंगावर काढू नका. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे. व्यापार्‍यांना हा‍तमिळवणी करावी लागेल. नोकरदारांनी आळस करू नये. 



कन्या:

सर्व कामे उत्साहात पूर्ण कराल. मन उत्साही राहील. मित्रांच्या सहवासात रमाल. काही गोष्टीत तडजोड करावी लागेल. घरात धार्मिक कार्य घडेल.



तूळ:

तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. कणखरपणा योग्य तिथेच दाखवा. योग्य ताळमेळ साधता येईल. दिवस मनासारखा घालवाल. कामाचा ताण जाणवेल. 



वृश्चिक:

कौटुंबिक समतोल राखावा. प्रेम व्यक्त करा. समस्यांचे निराकरण शक्य. मनाची चंचलता सांभाळावी. कामाच्या बाबतीत हयगय करू नका.



धनू:

दैनंदिन कामात टाळाटाळ करू नका. घरातील वातावरण शांत ठेवा. प्रलंबित कामे मार्गी लावा.  नातेवाईकांकडून अनपेक्षित लाभ मिळतील. तज्ञ व्यक्तींच्या भेटीचा योग. 



मकर:

भावंडांची काळजी लागून राहील.  घरातील गोष्टींसाठी पैसा खर्च कराल. प्रवास जपून करावा. सामाजिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. 



कुंभ:

इतरांना सढळ हाताने मदत कराल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देतील. मन:शांति लाभेल. 



मीन:

मानसिक स्वास्थ्य जपावे. व्यवसायिकांना उत्तम काळ. तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका.  नवीन घडामोडी घडतील. क्षुल्लक गोष्टींचा त्रास जाणवेल. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies