Type Here to Get Search Results !

“भाजपाचं कमळ आम्हाला फुलवायचं आहे आणि उद्धव ठाकरे यांची मशाल विझवायची आहे”



मुंबई:  राज्यात सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)चे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी  प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.


रामदास आठवले म्हणाले “अंधेरी पोटनिवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा भाजपाच्या उमेदवारास पाठिंबा आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे. उद्धव ठाकरे यांची मशाल जरी पेटलेली असल्याचं दाखवलेलं असलं तरी या निवडणुकीत ही मशाल विझवण्याचं काम आम्ही करणार आहोत. भाजपाचं कमळ आम्हाला फुलवायचं आहे आणि मशाल विझवायची आहे. यासाठी रिपब्लिकन पक्ष नक्कीच भाजपाच्या पाठिशी उभा राहणार आहे. ही निवडणूक आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आहोत. कारण, आमच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मजबूत अशी महायुती आहे.”



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies