मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाची बैठक आज बोलावली आहे. या बैठकीत दिवाळी बोनस बाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. एसटीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने जवळपास 2 हजार कोटी रुपयांची देणी बाकी आहेत. ही देणी कशी पूर्ण करता येतील यावर देखील चर्चा होणार आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 22 बोनस जाहीर झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मोठा बोनस जाहीर आहे. त्यामुळे यंदा चांगला बोनस मिळेल अशी अपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना आहे.