मुंबई: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा नवीन टीझर समोर आला आहे. 'एक नेता, एक झेंडा, एक मैदान... एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा!', असे कॅप्शन देत शिवसेनेने टीझर रिलीज केला आहे.
तसेच, या व्हिडीओमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे की, कुणाच्या पाठीत वार करायचा नाही. पण जर कुणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही', उद्धव ठाकरेंच्या भाषणातील हे वाक्य यात वापरण्यात आलं आहे.