मुंबई : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली.
विनायक राऊत म्हणाले, नारायण राणेंसारख्या तकलादू आणि स्वार्थी नेत्याच्या आरोपाला आम्हाला काडीचीही किंमत द्यायची नाही. लाचारी पत्करून राजकारणात काम करणारा माणूस म्हणजे नारायण राणे होय. तुम्ही लाचारी पत्करता. त्या लाचारांमध्ये विनायक राऊतांची तुम्ही गिणती नाही करू शकत, असा टोलाही विनायक राऊत यांनी नितेश राणे यांनाही लगावला.
दरम्यान, नितेश राणे यांनी विनायक राऊतही शिंदे गटात जाणार होते, असा गौप्यस्फोट केला. त्यावर उत्तर देताना राऊत बोलत होते.