Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, गुरुवार ०६ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!




मेष :

अनावश्यक तर्क-वितर्क करू नयेत. काम करताना डोक्यावर फार ताण घेऊ नका. कामातून समाधान मिळवाल.  खूप दिवसांपासून राहिलेले वाचन पूर्ण कराल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. 



वृषभ:

आपला दिवस चांगला जाईल.  मित्रांविषयी मनात ग्रह करून घेऊ नका. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका.  मुलांकडून आनंद मिळेल. जुनी येणी वसूल होतील. 



मिथुन:

कठीण कामात चिकाटी सोडू नका. घरातील कामात व्यस्त राहाल. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका.  कामात जोडीदाराची मदत होईल. कामात काही स्वाभाविक बदल संभवतात. 



कर्क:

जवळच्या प्रवासात समानाची काळजी घ्या.  विद्यार्थ्यानी मेहनतीला कमी पडू नये. नातेवाईकांची गाठ पडेल.  नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता. आवडीचे पदार्थ चाखाल. 



सिंह:

प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस. स्वत:वर पूर्ण आत्मविश्वास ठेवा. जुन्या मित्रांशी संपर्क साधला जाईल.  दिवस चांगला जाईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. 



कन्या:

जोडीदाराची गरज लक्षात घ्या. वैचारिक भावना वाढीस लागेल. एखादे जबाबदारीचे काम अंगावर पडू शकते.  घरातील लोकांचे सल्ले उपयोगी येतील. अधिक श्रम उपसावे लागू शकतात. 



तूळ:

दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. मात्र आपण त्यातून मार्ग काढू शकाल.  व्यवसायात अधिकार प्राप्त होतील. नातेसंबंध दृढ होतील. दिवसाची सुरुवात संमिश्र असेल. 



वृश्चिक:

प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस.  नोकरीत मनासारखे काम मिळेल. नवीन ओळख होईल. येणार्‍या काळात ओळखीचा फायदा होईल.   कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये. 



धनू:

मनात संशयाला थारा देऊ नका. मित्रांच्या मदतीने काही लाभ संभवतात. तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक ठरेल.  आत्मविश्वासाने कामे कराल. सासरच्या मंडळींकडून लाभाची शक्यता.  



मकर:

चर्चेतून मतभेद संपुष्टात येतील. गुंतवणुकी संदर्भात तज्ञांचा सल्ला घ्यावा. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस.  प्रलोभनाला भुलून जाऊ नका. दिवसाची सुरुवात उर्जेने होईल. 



कुंभ:

अनुभवी व्यक्तींच्या भेटीचा योग. काही खर्च अचानक येतील. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी.  अति तिखट पदार्थ टाळावेत. आरामाची इच्छा प्रबळ होईल. 




मीन:

ध्यानधारणेतून मानसिक तणाव कमी होईल. स्पर्धेत यश मिळवाल. महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा.  जोडीदाराचा सल्ला घ्यावा. अचानक धनलाभाची शक्यता. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies