जळगाव : भुसावळ येथील कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी मंत्री रामदास आठवले यांनी उध्दव ठाकरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर आपल्या अनोख्या शैलीतून जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले, “शिंदे गटातील आमदार हे गद्दार नाहीत. ते गद्दार असते तर त्यांच्या पाठीमागे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनता नसती. केवळ आमदार, खासदार शिंदे यांच्यासोबत नाही, तर संपूर्ण जनता ही त्यांच्या पाठीशी आहे. उध्दव ठाकरेंनी चुकीचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा तो निर्णय चुकला असे म्हणत दसरा मेळावा होत आहे. यात शिंदे व उध्दव ठाकरे असा सामना रंगणार आहे. उध्दव ठाकरेंच्या आरोपांवर चोख उत्तर एकनाथ शिंदे हे देतील. गद्दारी ही एकनाथ शिंदे नव्हे तर उध्दव ठाकरे यांनी केली. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला,असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.