Type Here to Get Search Results !

बस आणि कारचा भीषण अपघात; चार जण जागीच ठार!

 


लातूर: लातूर जिल्ह्यातील उदगीर लातूर रस्त्यावरील हैबतपुर पाटी नजीक आज एका चार चाकीचा आणि एसटीचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून  या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.



माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची उदगीरहून लातूरला जाणा-या बसचा आणि एका चार चाकीचा हैबतपूर पाटी जवळ अपघात झाला. या अपघात बसचे पुढचे चाक निखळले तर चार चाकीचा पुढचा भागाचा संपुर्णत: चुरा  झाला.



दरम्यान, या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत बचाव कार्यास प्रारंभ केला. तसेच,  सद्यस्थितीत चार जणांचा मृत्यू झाल्याचे समजले आहे . अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies