Type Here to Get Search Results !

शिंदे गटाच्या मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी बसमध्ये बिहारच्या लोकांना आणले बसवून?



मुंबई: शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळाव्याला काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे. शिवाय आपल्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्यासाठी ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. यासाठीच राज्यभरातून शिवसैनिकांना मुंबईत येण्याचं आवाहन देखील करण्यात आले आहे.अशातच, आता पुण्यातून चक्क बिहारी लोक शिंदे गटाच्या मेळाव्याला निघाल्याची माहिती समोर आली आहे.



माहितीनुसार, पुण्यातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मुंबईला मेळाव्यासाठी यायला काही बस ठरवल्या आहेत. या बसमध्ये चक्क बिहारच्या लोकांना बसवण्यात आले आहे. शिवाय आपण कुठे चालला आहात? असे विचारल्यानंतर कोण आपण 'बॉम्बे घुमने जा रहे है', तर कोणी आम्हाला गाडीत बसायला लावलं असल्याचे  सांगत आहेत. मात्र, त्यांना मेळाव्याबद्दल काहीही माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, गाडीतील केवळ एकाने आपण एकनाथ शिंदेंच्या भाषणासाठी निघालो असल्याचे सांगितले.




दरम्यान,  केवळ गर्दी करण्यासाठी ही लोकं जमवली जात आहेत का? असा सध्या प्रश्न उपस्थित होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies