Type Here to Get Search Results !

८ महिन्यांच्या गरोदर महिलेने पतीच्या प्रेयसीची केली हत्या!



मुबंई: मुंबईतील नेहरू नगर येथे पतीसोबत एका तरुणीचे प्रेमप्रकरण असल्याचे समजताच  रागात पत्नीने मैत्रीणींच्या मदतीने तरुणींची गळा आवळून हत्या केली.



याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,  मृत तरुणीचे प्रेम आरोपी महिलेच्या पतीसोबत होते. याचा राग मनात धरुन चेंबूरच्या माहुल परिसरात तीन महिलांनी मृत तरुणीचे हात-पाय बांधून तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानतंर माहुल येथून एका ऑटोरिक्षातून तरुणीचा मृतदेह गोणीमध्ये भरुण तो मृतदेह नेहरूनगरच्या नाल्यात फेकून दिला. आरोपीने त्याची एक बहीण शिल्पा आणि मैत्रिण डॉलीच्या मदतीने हा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.



दरम्यान, आरोपी स्वतः ८ महिन्यांची गरोदर असून नेहरूनगर पोलीसांनी आज तिन्ही आरोपी महिलांना न्यायालयात हजर करणार आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies