Type Here to Get Search Results !

चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी खुले, जंगल फिरण्यासाठी वनविभागाकडून बसची सोय

 

सरुड : चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटाकांसाठी पासून खुले करण्यात आले आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात  निसर्ग पर्यटनासाठी दरवर्षी वाढत असलेली पर्यटंकाची गर्दी लक्षात घेऊन यापुढे चांदोलीतील पर्यटनासाठी पर्यटकांना प्रवासासाठी वनविभागाकडून १७ आसन क्षमतेची बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रति पर्यटक १५० रु. तर लहान मुलांसाठी ५० रु प्रवास शुल्क घेवून वन विभागाकडून पर्यटाकांना या बसमधून जंगल सफारी घडवून आणली जाणार आहे.


विशेषतः जानेवारी ते मे अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये निसर्ग पर्यटनासाठी  या चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांची मोठी गर्दी असते.

  

चांदोली राष्ट्रीय उद्यानात ३३ प्रजातीचे सस्तन प्राणी, २४४ प्रजातींचे पक्षी, १२० प्रजातींची फुलपाखरे, २२ प्रजातींचे उभयचर प्राणी, ४४ प्रजातींचे सरपटणारे प्राणी आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे.  तर १४५२ प्रकारच्या विविध वनस्पती व ४०० प्रकारच्या औषधी वनस्पती या उधानात आढळून येतात.  तर ऐतिहासिक प्रचितगड हा किल्लाही याच उद्यानात आहे टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies