Type Here to Get Search Results !

पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या!



अहमदनगर: जिल्ह्यामुळा धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीवर कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने सर्व्हिस रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. भाऊसाहेब दगडू आघाव (वय ४९, रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव हे मुळा धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीवर कार्यरत होते. त्यांनी आज, शनिवारी सकाळी पावणे दहा वाजता मुळा धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीत आतून दरवाजा बंद करून पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव यांनी सर्व्हिस रायफल मधून स्वतःवर गोळी झाडून घेतली.त्यामुळे ते जागीच ठार झाले. 



दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुळा धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.भाऊसाहेब आघाव यांनी आत्महत्या का केली हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies