Type Here to Get Search Results !

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटकेंनी राजीनामा देऊनही पालिकेने स्वीकारला नाही!




मुंबई: शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या पालिकेच्या नोकरीतील राजीनामा देखील एक महिन्यापूर्वीच दिलेला आहे. मात्र अद्यापही मुंबई महापालिका प्रशासनाने त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही. यामुळे आता पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे काहीच दिवस शिल्लक राहिले असल्याने शिवसेना ठाकरे गटाची पालिकेत धावाधाव सुरू झाली आहे.



दरम्यान, ऋतुजा लटके यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून लढावे यासाठी त्यांच्यावर शिंदे गटाकडून दबाव येत असल्याची देखील चर्चा आहे महापालिकेच्या कर्मचारी संघटनांच्या आपापसातील चर्चा नुसार शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न व्हावा यासाठी पालिका आयुक्तांवर दबाव टाकल्याचा कुजबूज सुरू झाली आहे ऋतुजा लटके यांनी ठाकरे गटाऐवजी शिंदे गटातून लढावं यासाठी देखील शिंदे गट प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.



तसेच, लवकरात लवकर राजीनामा मंजूर व्हावा यासाठी अनिल परब यांच्यासह शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची टीम महापालिका आयुक्तांसह सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटल्याची माहिती समोर आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies