मुंबई : एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत हे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबर 2021 पासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. या सर्व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई परिवहन विभागाने कारवाई केली होती. त्यामुळे संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.
दरम्यान, या सर्व कर्माचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.