Type Here to Get Search Results !

संशयावरून पत्नीशी भांडण; चार्जर केबलने पत्नीचा गळा आवळून केला खून!



जळगाव : जळगाव शहरातील आहुजानगर परिसरातील निमखेडी शिवारातील ब्रह्मांडनायक अपार्टमेंटमध्ये जितेंद्र संजय पाटील (वय २५) याने पत्नी कविताचा मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून खून केला आहे.  संशयावरून पत्नीशी भांडण झाल्यानंतर पत्नीचा खून करून पती जितेंद्र स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला.



माहितीनुसार, जळगाव शहरातील आहुजानगर परिसरातील शिवधाम मंदिराजवळ ब्रह्मांडनायक अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये जितेंद्र व कविता पाटील हे दांपत्य वास्तव्यास आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी हे दांपत्य बांभोरी येथून जळगावात राहण्यासाठी आले होते. शनिवारी (ता.१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पती जितेंद्र याने पत्नी कविता हिचा मोबाईल चार्जरच्या केबलच्या साह्याने गळा आवळून खून केला.



दरम्यान, गळफास दिल्यावर पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर पती हा स्वतःच तालुका पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानेच पोलिसांना खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies