Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरेंकडून निवडणूक आयोगाकडे तीन चिन्ह सादर; पण....!



मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेतील दोन्ही गटांकडे आता धनुष्यबाण चिन्ह वापरण्याचा अधिकार तात्पुरता काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेतील ठाकरे गटाने आपल्या पक्षासाठी नवे चिन्ह ठरवले आहे.



उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे १) त्रिशुळ २) उगवता सुर्य आणि ३) मशाल या तीन चिन्हांचे पर्याय ठाकरे गटाकडून आयोगाला देण्यात आले आहेत. याशिवाय आपल्या गटाचं नावं हे १) शिवसेना बाळासाहेब ठाकरे २) शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि ३) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं मिळावं अशी मागणी आयोगाकडे ठाकरे गटाने केली आहे. 




दरम्यान, निवडणूक आयोगाकडे एकूण १९७ चिन्हे उपलब्ध आहेत. यातूनच दोन्ही गटांना आपापली चिन्हे निवडण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी आयोगाला पाठवलेली तिनही चिन्हे आयोगाच्या यादीत नसल्याने त्यांना ही चिन्हे मिळणार हा याबाबत शंका आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies