Type Here to Get Search Results !

“तुझ्या मुलीला रस्त्यात अडवून तिच्याशी.....”, अशी धमकी देत ६२ वर्षीय व्यक्तीने महिलेवर केला अत्याचार!



वर्धा : पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येसगाव येथे ६२ वर्षीय इसमाने ३५ वर्षीय महिलेवर निर्जनस्थळी नेत अत्याचार केला. अत्याचारच्या घटनेनंतर पीडितेने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने हा प्रकार समोर  आला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सुधाकर काळमेघ (६२) रा. येसगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, संशयीत आरोपी सुधाकर हा मागील काही महिन्यांपासून पीडितेला तिच्या मुलीच्या मैत्रीणीला माझ्याबद्दल सांग; माझ्याशी बोलायला लाव, असे म्हणत तगादा लावत होता. पीडितेने त्याला ती माझ्या मुलीसारखी आहे; असे म्हणून त्याला हटकले होते. पीडिता ही काही महिलांसोबत आरोपी सुधाकर याच्या शेतात निंदायला गेल्या होत्या. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान पीडिता विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता आरोपीने तिला अडवून मला तुझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायचे आहे, असा तगादा लावला. पीडितेने आरोपीस नकार दिला असता नराधमाने तु संबंध ठेवू दिले नाही तर तुझ्या मुलीला रस्त्यात अडवून तिच्याशी संबंध प्रस्थापित करेल, अशी धमकी दिली. अखेर पीडितेने घाबरुन जात त्याला होकार दिला. यानंतर नराधमाने महिलेला निर्जनस्थळी नेत अत्याचार केला.


दरम्यान, आरोपी व त्याच्या दोन मुलांनी बदनामी केल्याने पीडितेने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला जखमी अवस्थेत सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. व पोलिसांनी तत्काळ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies