मुंबई: शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. याला आता शिवसेना नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
त्या म्हणाल्या, “आता आरोपाचा कंटाळा यायला लागला आहे. खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले जातात. मात्र त्यात खरच तथ्य आहे का हे शोधलं पाहिजे. आमचं काम आम्ही करत आहोत. आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये नेऊन दिले जात होते. सचिन वाझे हेच मातोश्रीवर खोके घेऊन जात होते असा आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे. प्रतापराव जाधव यांच्या या टीकेला आता शिवसेना नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.