Type Here to Get Search Results !

शिंदे आणि ठाकरे कुटुंब विवाह बंधनातुन येणार एकत्र?



पुणे - सध्या राज्याच्या राजकारणात शिंदे आणि ठाकरेंमध्ये फूट पडली असली तरीही जुन्नर तालुक्यात मात्र ठाकरे आणि शिंदे यांच्यात दिलजमाई झाली आहे. हे एकत्र येणारे ठाकरे आणि शिंदे हे उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे नाहीत तर जुन्नर तालुक्यातील वडगाव सहाणी गावचे खंडेराव शिंदे यांचे पुतणे विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची कन्या अनुराधा आहेत.




आता शिंदे आणि ठाकरे कुटुंब विवाह बंधनातुन उद्या म्हणजेच ८ ऑक्टोबरला एकत्र येत आहे. याची सर्वत्र चर्चा सुरु झालीत आहे. लग्नाची लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.



दरम्यान, या लग्नाचे निमंत्रण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही दिले आहे. आम्ही जसं लग्नातून दोन कुटुंब एकत्र आलोय तसेच आपण एकत्र यावे अशी साद या निमित्ताने शिंदे कुटुंबाकडून घालण्यात आली आहे. त्यामुळे या लग्ना सोहळ्यातुन झालेली चर्चा खरच शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणणार का हे पहावे लागणार.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies