Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, रविवार ०९ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

सारासार विचार करण्यावर भर द्यावा. व्यवसाय विस्ताराच्या कल्पनांना मूर्त रूप द्या.  अनीतिचा मार्ग अवलंबू नका. साधा व सोपा मार्ग स्वीकारा. भौतिक विकास होऊ शकेल. 



वृषभ:

कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील.  मनातील शंका काढून टाकाव्यात. धीराने कामे करावीत. त्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. नवीन योजनांकडे अधिक लक्ष द्या. 



मिथुन:

जोडीदारासोबत उत्तम काळ व्यतीत कराल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल.  घरात नवीन खरेदी केली जाईल. हातून काही कल्पक कार्य घडेल. कलेचे कौतुक केले जाईल. 



कर्क:

कार्यालयातील सहकारी सहकार्य करतील.  योग्य वेळी बुद्धीचा वापर करावा. भावंडांचा सल्ला मोलाचा ठरेल. आजाराकडे दुर्लक्ष करू नका. मोठ्या अधिकार्‍यांचा हस्तक्षेप उपयोगी ठरेल. 



सिंह:

नवीन जबाबदारी खांद्यावर पडू शकते.  कपटी लोक ओळखून वागा. सर्वांशी गोडीने वागाल. विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. दिवस व्यस्त राहील. 



कन्या:

आपण आणि आपले काम एवढेच पहा. विद्यार्थ्यांना परिश्रमाचा काळ. हितशत्रूंपासून सावध राहावे.  सोप्या वाटणार्‍या गोष्टी सहजपणे घेऊ नका. वादाचे प्रसंग टाळावेत. 



तूळ:

जुने वाद मिटू शकतील. घरातील कार्य मार्गी लागतील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा.  कामात एखाद्याचा हस्तक्षेप घ्यावा लागेल. व्यवहारासंबंधी मुद्दे मार्गी लावा. 



वृश्चिक:

कार्यक्षेत्रात नवीन विचार घेऊन जाल. गुंतवणुकीसाठी योग्य काळ. मानसिक प्रसन्नता लाभेल.  पुढील पाऊल उचलताना तज्ञांचा सल्ला घ्यावा. सकारात्मक विचार करावा. 



धनू:

विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी.  उद्योगात जोखीम पत्करून काम करावे लागेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. दैनंदिन कामात थोडा बदल करून पहावा. कौटुंबिक समस्या धीराने सोडवा. 



मकर:

एखादी सकारात्मक वार्ता मिळेल. वादाचे प्रसंग टाळावेत. जोडीदाराच्या खुशालीसाठी खर्च कराल. भागिदारीतून लाभ मिळेल. कामात अपेक्षित परिवर्तन दिसून येईल. 



कुंभ:

सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. वडीलांचे मार्गदर्शन घ्यावे.  व्यापारी वर्गाला सुखद दिवस. नवीन ओळख होईल. 



मीन:

बौद्धिक चातुर्य वापरावे लागेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कामातील काही समस्या सुटतील. आपल्या बोलण्यात मृदुता ठेवा. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies