Type Here to Get Search Results !

'आदिपुरुष’ चित्रपट महाराष्ट्राच्या भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही': ‘यांचा’ इशारा!



मुंबई: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरूष' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे. 'आदिपुरुष'मधील रावणाचा लूक पाहता नेटकऱ्यांपासून चित्रपटसृष्टीतील मंडळींकडून निषेध व्यक्त होत असतानाच, आता मुंबईतील भाजप आमदार राम कदम यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करू देणार नसल्याचा इशारा दिला आहे.



राम कदम यांनी गुरुवारी सकाळी दोन ट्विट करत चित्रपट निर्मात्यांनी तुटपुंजी प्रसिद्धी मिळवण्यासाठी देवी-देवतांचा अपमान केल्याचे म्हटले आहे. अशा घाणेरड्या विचारसरणीला धडा शिकवण्यासाठी चित्रपटावर बंदी घालण्याची गरज आहे. तसेच, 'आदिपुरुष महाराष्ट्राच्या भूमीत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही', , आदिपुरुष चित्रपटातून तुटपुंजी प्रसिद्धी मिळवण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी पुन्हा एकदा कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आता ती पुन्हा वेळ आली आहे. नुसती माफी मागून चालणार नाही, असेही ते म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies