मुंबई: १०० कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जातमुचलकीवर न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'सत्यमेव जयते. शेवटी सत्याचा विजय झाला. मला मनापासून आनंद झाला आहे. अनिल देशमुख यांना जामीन झालाय. बाकीच्यांनाही लवकर जामीन होईल असं आम्हाला वाटतं'. तसेच, संजय राऊत यांना ऑक्टोबर महिन्यात जामीन मांडला जाणार आहे. त्यावर बोलतना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सर्वांनाच लवकर जामीन होईल,त्यामध्ये नवाब मलिक असतील. एकनाथ खडसे यांचे जावई यांचे जावई यांनाही जामीन होईल त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत’, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले.