Type Here to Get Search Results !

ठाकरेंना हवी असलेली २ चिन्हे शिंदेंनीही मागितली; वाद पुन्हा वाढण्याची शक्यता?



मुंबई: शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या वादाचा पुन्हा वाढला आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटाला नवीन नाव आणि पक्षचिन्हांचे तीन-तीन पर्याय देण्यास सांगितले होते. त्यामुळे आता दोन्ही गटांकडून नवीन चिन्हासाठी नावे सादर करण्यात आली आहे.



माहितीनुसार,  ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक चिन्हासाठी सूचवलेल्या तीन-तीन नावांपैकी प्रत्येकी दोन-दोन नावे ही सारखीच आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे त्रिशूल, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही नावे सूचवण्यात आली तर शिंदे गटाकडून त्रिशूल, उगवता सूर्य आणि गदा ही नावे सूचवण्यात आली आहेत.



दरम्यान, यातील त्रिशूल या चिन्हावर दोन्ही गटांकडून दावा करण्यात आला आहे. पण त्रिशूल चिन्ह दोन्ही गटाला मिळण्याची कमी शक्यता आहे. कारण, धार्मिक चिन्हावरून याआधीच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies