Type Here to Get Search Results !

“उद्या आदित्य ठाकरे यांनाही मूलबाळ होणार आहे, त्यामुळे.....” ‘यांची’ ठाकरेंवर टीका!



जळगाव : उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बाप मुख्य मंत्री, मुलगा खासदार व नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसल्याचे म्हटले होते. ठाकरे यांच्या या वक्तव्याबाबत गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रीया देताना ठाकरेंवर टीका केली आहे.



गुलाबराव पाटील म्हणाले, “दीड वर्षाच्या मुलावर उद्धव ठाकरे यांच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीने टीका करणे हे निषेधार्ह आणि चुकीचे आहे. राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये; उद्या आदित्य ठाकरे यांनाही मूलबाळ होणार आहे. त्यांनी अशी टीका करायला नको होती, असे पाटील यांनी वक्तव्य केले.



तसेच, ते म्हणाले, “सध्या सेनेच्या दोन गटात धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? या विषयावर चर्चा सुरू आहे. मात्र खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांची संख्या बळाचा विचार करता धनुष्य आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies