Type Here to Get Search Results !

“मी आत्महत्या करेल आणि तुझ्या नावाची चिठ्ठी...”: धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार!



एरंडोल (जळगाव):माझ्याशी लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेल आणि तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल, अशी धमकी देऊन सतरा वर्षीय मुलीवर औरंगाबाद येथे नेऊन लैंगिक अत्याचार केला. याबाबतची तक्रार पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात दिली. पीडितेच्या तक्रारीवरून संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, गणेशनगर तांडा (ता. एरंडोल) येथील सतरा वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. बेपत्ता असलेली तरुणी व एक युवक औरंगाबाद येथील जोगेश्वरीनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. एरंडोल पोलिसांचे पथक औरंगाबाद येथील जोगेश्वरीनगर येथे गेले असता त्यांना ही युवती व दिनेश बाबूलाल पवार हा एका खोलीमध्ये आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही एरंडोल येथे आणले असता पीडित युवतीने आपबीती पोलिसांना दिली. दिनेश याने माझ्याशी लग्न कर अन्यथा मी गळफास घेऊन आत्महत्या करेल आणि तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल, अशी धमकी दिली. घरात याबाबत कोणासही सांगायचे नाही, असे देखील धमकावले. ३ ऑक्टोबरला संशयित दिनेशने पीडितेस औरंगाबाद येथे नेले. जोगेश्वरीनगरमध्ये भाड्याची खोली घेऊन अत्याचार केले.


दरम्यान, याबाबत पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दिनेश पवार याच्याविरुद्ध पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.(सौ.साम) 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies