Type Here to Get Search Results !

“मी तुमच्या पाया पडते कृपया माझं......”: पंकजा मुंडेचे नाराजीच्या चर्चेवर मोठे वक्तव्य!



बीड : दसऱ्याच्या मुहूर्तावर बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात बोलत होत्या. 



भगवान गडावर आयोजित मेळाव्यात त्या म्हणाल्या कि, माझी मीडियाला विनंती आहे, पुढे कोणत्याही आमदारांची यादी आली तर कृपया माझं नाव चालवू नका, मी तुमच्या पाया पडते. मी आता २०२४ च्या तयारीला लागली आहे. पंकजा नाराज आहे, नाराज आहे, कशाला नाराज आहे? कुणावर नाराज आहे? दसरा मेळाव्याला तुम्ही आला नाहीत, तर मी नाराज होईल. मी नाराज नाही. मी नाराज का होऊ? हे काय घरगुती भांडण आहे का नाराज व्हायला, हे राजकारण आहे.



मोठ्या मोठ्या लोकांना राजकारणात संघर्ष करावा लागला आहे. तो संघर्ष तुमच्या लेकीच्याही वाट्याला आला आहे. योग्य वेळेची वाट बघा, अशी गर्जना माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर आयोजित मेळाव्यात केली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies