Type Here to Get Search Results !

“पुरुषांनी आपल्या मनाला आवर घालण्याची गरज होती पण महिलांना....”: भाजपच्या मंत्र्यांचे मोठे वक्तव्य!



चंदीगड: कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांचं खंडपीठ सुनावणी करणार आहे. अशातच आता हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी एक ट्विट केलं आहे.तसेच,या ट्विटमधून पुरुषांवर जोरदार टीका केली आहे.



अनिल विज या ट्विट मध्ये म्हणाले, “ज्या पुरुषांचं मन महिलांना पाहून विचलित होत होतं. त्यांनी महिलांना हिजाब परिधान करण्याची सक्ती केली. खरे तर पुरुषांनी आपल्या मनाला आवर घालण्याची गरज होती. पण त्यांनी शिक्षा महिलांना दिली. महिलांना डोक्यापासून पायापर्यंत अंग झाकायला भाग पाडलं. ही अन्याय आहे. पुरुषांनी आता मन कठोर करावं आणि महिलांना हिजाबमधून मुक्ती द्यावी, असं अनिल विज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies