Type Here to Get Search Results !

“....नाहीतर चौकात उगडा करुन मारू”: ‘यांची’ तानाजी सावंतांना धमकी!



उस्मानाबाद : उस्मानाबादेत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर खालच्या स्तरावर राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी टीका केली आहे. अजित पवार व्यासपीठावर असताना सुरेश पाटील यांनी ही टीका केली आहे.



ते म्हणाले,  एक माजलेला मंत्री मराठा समाजाबद्दल बेभान बोलतो, आरक्षण आताच आठवले का? मराठ्यांना माज आला का? असे म्हणतो. तानाजी सावंतांनी मराठ्यांबद्दल नीट बोलावं नाहीतर चौकात उगडा करुन मारू. यांचा माजुरीपणा उतरलाच पाहिजे, अशी टीका कारखानदार सुरेश पाटील यांनी केली आहे.



दरम्यान, सुरेश पाटील यांच्या टीकेनंतर अजित पवारांनीही तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. काही लोकांनी तर मराठा समाजाची खाज काढली, त्यांच्या घरचा आहे का? अशी टीका अजित पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies